कोरोनाला पळून लावू
*अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचं सर्वांनी अवश्य वाचा...*
Mrs.paranjpe & her husband both retired as Sr. Scientists from BARC & recovered from COVID sharing in simple language causes & remedies.
डॉ . अकल्पिता परांजपे
आपण माझी "कोरोना ची आणि माझी भेट" ही पोस्ट वाचलीत. आणि भरभरून प्रतिसाद पण दिलात. त्यात काही प्रश्न अनुत्तरित आहेत.
आज त्यांची उत्तरे द्यायला सुरवात करूया.
त्याकरता प्रथम पोस्टचा काही भाग पुनर्रउददघृत
करणार आहे. म्हणजे पूर्वीची पोस्ट न वाचणाऱ्यांना सुद्धा ही पोस्ट समजेल.
अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायू कमी पडल्याने व फुफ्फुसांच्या त्रासाने होतो. काही रुग्णांना कोरोना बरा झाल्यावर सुद्धा श्वसनाचा त्रास होतो. कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का?
आपण याच उत्तर दोन दिशांनी शोधू शकतो. विज्ञान काय सांगत? हा विषाणू आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरतो. आणि पेशी स्वतःच द्विभाजन करायला जी यंत्रणा वापरतात, त्याच यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या मोठ्या प्रमाणात प्रति तयार करतो. अगदी आपल्या कवचाला लागणाऱ्या प्रथिनांना सुद्धा तयार करवतो. आणि मग प्रथिने स्वयंसिद्ध अनुभूतीने या विषाणूचे कवच तयार करतात. अश्या खूप प्रति निर्माण झाल्या, की आपल्या पेशींच्या कवचाला तो भार सहन होत नाही व ते कवच फुटते. मग दोन गोष्टी घडतात. एक, आपल्या पेशीचा मृत्यू होतो. आणि तिचे विघटित तुकडे जिथे ही घटना घडते तिथे पडून राहतात.
हे युद्ध जर आपल्या फुफ्फुसांमध्ये झाल असेल, तर धारातीर्थी पडलेल्या पेशीचे शव तिथेच पडले राहते. अश्या अनेक पेशींचा मृत्यू झाला, कि तिथे अश्या कचऱ्याचा ढीग निर्माण होतो. आणि मग आपल्या रोगप्रतिकारक शक्तींनी जरी या विषाणूंवर मात केली तरी हा कचऱ्याचा ढीग तिथेच पडला राहतो.
ही जर आपली लाल रक्तपेशी असेल, तर तिच्या विघटनामुळे त्यातील लोह कण विलग होतो आणि तो प्राणवायूचे वहन करण्याच्या कामी येत नाही. त्यामुळे प्राणवायूची कमतरता जाणवायला लागते. भरीस भर म्हणजे विघटनातून उरलेल्या शकलांचा ढीग आपली फुफ्फुसेपण मोकळी ठेवत नाही. त्यामुळे विषाणू गेला तरी जोपर्यंत हा ढीग उपसला जात नाही तोपर्यंत श्वासोश्वासाला त्रास होतो.
आणखीन एक महत्वाची बाब. आपल्या फुफ्फुसात सर्वात छोटे छोटे कप्पे असतात, ज्यात वातवरणातील प्राणवायू रक्तात मिसळतो व नको असलेला करबवायू हवेत जातो, है ताजे प्राणवायू असलेले रक्त अत्यंत सूक्ष्म रक्तवाहिन्यातून परत शरीरात जाते. कोरोनाच्या मुळे ह्या रक्तवाहिन्यात रक्ताच्या गाठी होतात व रक्तवाहिन्या बंद झाल्याने प्राणवायू रक्तात पोहोचू शकत नाही व त्यामुळे त्याची कमतरता भासते. सूक्ष्म रक्तवाहिन्यांमधील गोठलेले रक्त काढण्याचा प्रयत्न आधुनिक उपचार पद्धतीतील रक्त पातळ करणारी रसायने व स्टीयरॉइड्स देऊन करतात.
सध्या जो महत्वाचा प्रश्न भेडसावतो आहे तो म्हणजे फुफ्फुसांच्या निष्क्रियतेमुळे होणाऱ्या मृत्यूंचा. लक्षात घ्या, ज्याला आपण मॉडर्न मेडिसिन म्हणतो, त्या औषध प्रणाली मध्ये फुफ्फुसात जमलेले अवशेष काढण्याची क्षमता असलेले कोणतेच औषध उपलब्ध नाही. हे काम आयुर्वेदाची किंवा होमियोपॅथीची औषधे लीलया करू शकतात. अश्यावेळी प्राणवायू देणे हे जीवितहानी वाचवू शकते. पण त्यानी जर फायदा झाला नाही तर रोग्याला अतिदक्षता विभागात हलवले जाते आणि तिथे कृत्रिमरीत्या फुफ्फुसात प्राणवायू सोडला जातो. (vantilator). ही क्रिया तेथे साचलेले पेशींचे अवशेष तर काढू शकत नाही, पण त्या अवशेषांवर नको तो दाब मात्र वाढवू शकते.
आता पुढचा प्रश्न: मग ही पडलेली घाण कशी साफ करायची.
हा प्रश्न अत्यंत कौशल्याने सोडवावा लागतो. प्रथम या अवशेषांचे विघटन करणारी औषधे देणे, नंतर त्यांना रक्तप्रवाहामध्ये आणणे व तदनंतर रक्तातून बाहेर फेकण्याची औषधे देणे (डिटॉक्सिफिकेशन). होमिओपॅथीद्वारे हे काम होमिओपॅथच्या सल्याविना घरच्याघरी करता येणार नाही. हाच न्याय आयुर्वेदाला सुद्धा लागू होतो. त्यामुळे अशी औषधे आपण इथे देऊ शकत नाही.
पण मी तुमची निराशा करणार नाही. प्रथम मी आमचा प्रश्न कसा सोडवला याचे उत्तर देते.
आणि नंतर वैद्याच्या सल्ल्याशिवाय घेता येणारी औषधे पुढे सांगते.
मी व माझ्या यजमानांनी अवशेषांना बाहेर काढण्याच्या दृष्टीने अर्निका, हायपरिकम, सिलिसिया इत्यादी औषधे घेतली. pulse non commensurate with temperature असल्याने पायरोजीनम घेतले. ही सर्व होमियोपॅथीची औषधे आहेत. या औषधांनी फरक पडला पण खूप जास्त नाही. मग एकेदिवशी माझ्या भावानी हळद घ्यायला सांगितले. आणि मग माझ्या डोक्यात लख्ख प्रकाश पडला. आमच्या लहानपणा पासून ते आजतागायत कुठेही रक्त साकळले, जखम झाली सूज आली तर हळदीचा उपयोग करण्याची प्रथा आहे. तेंव्हा हि पारंपरिक औषधी घ्यायला कोणताच प्रत्यवाय नाही. एक तर ती सहज उपलब्ध असते. व ती आपण रोजच्या जेवणात वापरतो, म्हणजेच तिच्यामुळे शरीरावर दुष्परिणाम होणार नाहीत. शिवाय हायपरिकम व अर्निका दोहोच काम ही एकटीच करणार. मग आम्ही हळदीचा अर्क घेण्याचे ठरवले. माझ्याकडे ओली हळद होती. त्यात तीन गोष्टी आढळल्या:
१ हळदीचा रंग जवळजवळ काळपट लाल होता.
२ कोणत्याही प्रकारची कीड, बुरशी लागली नव्हती.
३ अत्यंत सुगंधी होती.
मी त्याचा अर्क तयार केला. तो गहिरा केशरी आहे.
मग आपण घरात वापरतो ती हळद पिवळी का दिसते? आणि त्या हळकुंडांना सहज कीड लागते. आपण घरात वापरतो ती हळद आधी पाण्यात उकळून तुकडे करून सुकवून वाळवलेली असते. त्यामुळे पाण्याबरोबर त्यातील काही अंश वाहून जातो.
असो. या हळदीचा अर्क व गोळ्या बाजारात मिळतात. त्याला करक्युमा लोंगा असे म्हणतात. हा अर्क आम्ही दररोज सकाळ संध्याकाळ दहा थेम्ब घ्यायला सुरवात केली. गरम पाण्या बरोबर. अत्यंत चविष्ट आणि सुगंधी. दोन दिवसात फरक जाणवला. शिवाय बारीक ताप येत होता (९८.F ते ९८.५F) तो पण कमी झाला. ह्या वेळे पर्यंत शेतावरून कडुनिंबाची पाने पण आली होती. वैद्य पल्लवी कानिटकरांच म्हणणं होत की कडुनिंब जर रोज सेवन केला तर १५ दिवसात भारत कोरोना मुक्त होईल. त्यांच्या अनुभवावरून अगदी कोरोना रुग्णांना हॉस्पिटल मध्ये इतर औषधांबरोबर कडुनिंबाची ४० पाने दिवसातून एकदा दिली तरी सुद्धा रुग्ण बरे होतात. तेंव्हा आम्ही दोघांनी सकाळी व संध्याकाळी चहा पूर्वी कडुनिंबाच्या पानांची गुळात करून घेतलेली गोळी चावून खायला सुरवात केली. ह्यानंतर आमचे, SpO2 ९६-९७, नाडी ७२-७४ व ताप ९७C-९७.५C च्या दरम्यान यायला लागले. श्वसनाचा त्रास पण कमी झाला.
या काळात माझी पोस्ट यावाचून बरेच फोन येत होते. त्यांना वैद्य कानिटकर व वैद्य प्रमोद कलोसे यांनी दिलेली औषधे व त्यांचा घेण्याचा क्रम कळवला. पण त्यात तीन वयस्क व्यक्ती (वय ६७, ७३ व ९०) जे दवाखान्यात होते त्यांच्या नातेवाईकांचे फोने आले. एक गृहस्थ ICU व इतर दोघे oxygen वर. या सर्वांना तेथील डॉक्टरांच्या संमतीने कडुनिंबाच्या गोळ्या व curcumen longa Q घेण्यास सांगितले. आनंदची गोष्ट म्हणजे दोन दिवसात दोघांच SpO2 सामान्य झाल व त्यातील दोघांना दवाखान्यातून घरी सोडण्यात आल. ICCU मधील आजोबा general ward मध्ये आले.
या सर्वातून आपण काय निष्कर्ष काढायचा?
१ मी व माझे यजमान डॉ श्रीनिवास यांचे सर्व पॅरामीटर्स कडुनिंब व हळद अर्काच्या सेवनाने नॉर्मल झाले.
२ ज्या रुग्णांना श्वसनाचा त्रास होता तो दोन दिवसात कमी झाला व ते धोक्याच्या बाहेर आले.
३ कडुनिंबाची पाने उपलब्ध नसल्यास किंवा रुग्ण हॉस्पिटलमध्ये भरती असल्यास कडुनिंबाच्या व curcumin longa च्या गोळ्या chemist कडे उपलब्ध असतात.
वैद्य कानिटकरांच्या म्हणण्या प्रमाणे आपण जर रोज १० कडुनिंबाच्या पानांचे सेवन केले तर कोरोना पासून लांब राहू व संसर्ग झाला तर ४० कडुनिंबाची पाने सकाळी सेवन केल्यास या रोगाच्या प्रादुर्भावातुन मुक्त होऊ.
आपण वैज्ञानिक दृष्ट्या ही गोष्ट सिद्ध झाली असे म्हणू शकत नाही, पण आत्तापर्यंतच्या अनुभवाने त्याला दुजोरा मिळतो असे आपण म्हणू शकतो. शिवाय झालाच तर फायदा पण नुकसान काही नाही या तत्वानुसार दवाखान्यातील डॉक्टरांच्या व पेशंट किंवा त्यांच्या नातेवाईकांच्या संमतीने ही औषधे देण्यास प्रत्यवाय नसावा.
हळद व कडुनिंब हे आपल्या भारतीय परंपरेत पूर्वापार वापरले जाणारे योग आहेत. आता सर्वांना डॉक्टर कडे जा आणि पटकन गोळी गिळा हि सवय झाल्यामुळे या गोष्टींचे विस्मरण झाले आहे. परंतु या गोष्टी प्रत्येक गावात आणि शहरात सहज उपलब्ध होतील. आमचा असा दावा नाही की यांनी सर्वांना कोरोनापासून लगेच मुक्ती मिळेल. परंतु बिन पैशाचा आणि हजारो वर्षांचा अनुभूत योग असल्याने करून बघितला तर झालं तर फायदा व नुकसान काही नाही. ज्यांना कडुनिंब घेण्याची भीती वाटत असेल त्यांनी घेऊ नये. पण खूप शंका कुशंका उपस्थित करून इतरांना परावृत्त करू नये. माझी पोच असलेल्या गावांमध्ये लोकांनी कडुनिंब घ्यायला सुरुवात केली आहे आणि त्यांना अनुभव चांगले आहेत. कोरोनाची चाचणी न करता जर गावे कोरोना मुक्त राहिलीत तर आपल्याला आक्षेप घेण्याचे कारण नसावे.
माझा हे सर्व सविस्तर सांगण्याचा प्रपंच अश्यासाठी की सध्या अनेक कारणांमुळे लोकांनी करोनाची धास्ती घेतली आहे. परंतु आपण काळजी घेतली तर हा विषाणू आपल्याला फार त्रास न देता जाऊ शकतो हे लक्षात घ्या. लोकजागृती हा ह्यामागचा उद्देश आहे. आणि या संकटातून कसा मार्ग काढायचा त्याबद्दल काही सूचना आहेत. अनेक दिवसांपासून मी सर्वांना सांगण्याचा प्रयत्न करत आहे की सुसज्ज राहा पण भीतीच्या छायेत वावरू नका. आपल्याला जर सामोरे जावे लागले तर कसे बाहेर पडायचे याचा विचार करा.
कडुनिंब आणि हळदीचा अर्क हे कोरोना संबंधीच्या तक्रारी दूर करून या विषाणूच्या संसर्गातून बाहेर पडायला मदत करतील अशी अपेक्षा आहे. प्रयत्न करणे आपली हाती आहे. तो आपण करूया.
ही पोस्ट आपल्या सर्वांच्या मनातील भीती दूर करण्या करीता लिहिली आहे. ती वाचा, त्याची प्रत करा, ती आपल्या आप्तांना कळवा, आणि लोकजागृतीच्या या यज्ञात सहभागी व्हा.
मी परत एकदा कळकळीची विनंती करते. काही शंका आली तर आधी तुमच्या जवळच्या होमिओपॅथी किंवा आयुर्वेदिक डॉक्टरकडे जा. किंवा तुमच्या नेहेमीच्या कौटुंबिक डॉक्टरला भेटा. तुम्हाला कोविद झाला आहे किंवा नाही हे जाणून घेण्याच्या भानगडीत पडू नका. तुमच मानसिक, शारीरिक आणि आर्थिक स्वास्थ्य महत्वाचं आहे. ते टिकवून ठेवा.
आम्हाला किंवा आमच्या कार्यकर्त्यांना तुम्ही मार्गदर्शना करीता कधीही फोन करू शकता.आपल्याजवळ असलेल्या उपचार डॉक्टरशी आपला सम्पर्क करून दिला जाईल. एक कार्यकर्ता म्हणून तुम्हाला आमच्या बरोबर यायचं असेल तर तस आम्हाला कळवा. आपल नाव, पत्ता, फोन क्रमांक द्या. आणि या देशहिताच्या कार्यक्रमात सहभागी व्हा.
जय हिंद. जय भारत.
Jay Hind Jay bharat
ReplyDelete