Posts

Showing posts with the label एक सत्य

एक सुंदर सत्य

 *एक जोडपं लग्नानंतर हनिमून साठी म्हणून एका हिलस्टेशनला जाते. बस मधून जात असताना अचानक नवऱ्याच्या मनात येतं आपण येथेच उतरावं आणि इथून मस्त निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत चालत जावं .......हा विचार मनात आल्यावर तो त्याच्या बायकोला घेऊन बस मधून उतरतो हे दोघेजण उतरल्यावर बस पुढे निघते आणि काही अंतर गेल्यावर अचानक त्या बसवर दरड कोसळते बस मधील अनेक प्रवासी जागेवरच मृत्यूमुखी पडतात तर काहीजण गंभीर जखमी होतात हे पाहून नवरा लगेच बायकोला म्हणतो...` बरे झाले की नाही आपण बस मधून उतरलो नाहीतर आज आपल्यासोबत काय झाले असते काय माहीत ! '* *हे ऐकलं मात्र डोळ्याच्या कडा पाणावलेली 'ती' म्हणाली.....................* *आपण जर उतरण्यासाठी म्हणून बस थांबवली नसती तर कदाचित ती बस त्याक्षणी पुढे निघून गेली असती ज्यावेळी ती दरड कोसळली ............* *आपल्याला उतरायचे होते म्हणून बस काही काळ थांबली आणि नेमकी दरड कोसळण्याची वेळ आणि बस तिथून जाण्याची वेळ साधली गेली आपण नसतो उतरलो तर किती बरं झालं असतं.......*  *सध्या या दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांची खूप गरज आहे आज-काल सगळेजण आपला स्वतःपुरता विचार करतात ,`...