एक सुंदर सत्य
*एक जोडपं लग्नानंतर हनिमून साठी म्हणून एका हिलस्टेशनला जाते. बस मधून जात असताना अचानक नवऱ्याच्या मनात येतं आपण येथेच उतरावं आणि इथून मस्त निसर्गाचा आस्वाद घेत गप्पा मारत चालत जावं .......हा विचार मनात आल्यावर तो त्याच्या बायकोला घेऊन बस मधून उतरतो हे दोघेजण उतरल्यावर बस पुढे निघते आणि काही अंतर गेल्यावर अचानक त्या बसवर दरड कोसळते बस मधील अनेक प्रवासी जागेवरच मृत्यूमुखी पडतात तर काहीजण गंभीर जखमी होतात हे पाहून नवरा लगेच बायकोला म्हणतो...` बरे झाले की नाही आपण बस मधून उतरलो नाहीतर आज आपल्यासोबत काय झाले असते काय माहीत ! '*
*हे ऐकलं मात्र डोळ्याच्या कडा पाणावलेली 'ती' म्हणाली.....................*
*आपण जर उतरण्यासाठी म्हणून बस थांबवली नसती तर कदाचित ती बस त्याक्षणी पुढे निघून गेली असती ज्यावेळी ती दरड कोसळली ............*
*आपल्याला उतरायचे होते म्हणून बस काही काळ थांबली आणि नेमकी दरड कोसळण्याची वेळ आणि बस तिथून जाण्याची वेळ साधली गेली आपण नसतो उतरलो तर किती बरं झालं असतं.......*
*सध्या या दुसऱ्या विचारसरणीच्या लोकांची खूप गरज आहे आज-काल सगळेजण आपला स्वतःपुरता विचार करतात ,`आपण वाचलो ना मग झाले तर .....!ʼ*
*पण आपल्या एका कृतीमुळे अनेक जणांचा प्राण वाचू शकतो हे मात्र कोणाच्याच लक्षात येत नाहीये काही घटना अगदी अनपेक्षितपणे घडतात पण त्या घडून गेल्यानंतर मग मात्र आपल्याला जाणीव होते की कदाचित आपण ही घटना बदलू शकलो असतो..... सध्या जी परिस्थिती आपण पाहतोय त्या परिस्थितीमुळे निर्माण होणारे भीषण भविष्य बदलायचे असेल तर एकच करायला हवं.....*
*आपल्यापुरता विचार न करता सगळ्यांचा विचार करा.......आणि त्यासाठी .....*
*1)आपल्या घरातच बसा.*
*2)अगदीच नाइलाज असेल तरच बाहेर पडा.*
*3)स्वतःची काळजी घ्या आणि पर्यायाने आपल्या संपर्कात येणाऱ्या सर्वांनाच सुरक्षित ठेवा*
*लक्षात ठेवा ही लढाई सहकार्याने लढायची आहे तुमचं सहकार्य भविष्य बदलवू शकते*...
Comments
Post a Comment