एक अशी सुंदर कविता वडिलांवर....

बाबा
⚡⚡⚡⚡⚡
असा का रे बाबा तु
कितीही थकलास तरी
का नाही रे
चिडत तु
⚡⚡⚡⚡⚡
तु तुझ्या भावना
कधीच व्यक्त करत नाहीस
तुझ माझ्यावरच प्रेम
कधीच बोलुन दाखवत नाहीस
⚡⚡⚡⚡⚡
तुझा कुठलाही त्रास
एक लेकच समजु शकते
तु कितीही नाही बोललास
तरी तुझ मन मीच वाचु शकते
⚡⚡⚡⚡⚡
तुझी शिकवण
आजही मला आठवते
तुझ्या सोबत घालवलेला प्रत्येक क्षण
मी रोजच जगत असते
⚡⚡⚡⚡⚡
रोज येते रे बाबा
तुझी आठवण मला
तुझी लेक आता मोठी झाली
हे कळलय ना रे तुला

Comments

Popular posts from this blog

Shayari

खुबसुरत शयरिया