अंधार फार झाला थोडा उजेड ठेवा अंधार फार झाला पणती जपून ठेवा अंधार फार झाला आले चहु दिशांनी तुफान विस्मृतीचे नाती जपून ठेवा अंधार फार झाला काळ्या ढगात वीज आहे पुन्हा टपून घरटी जपून ठेवा अंधार फार झाला हे गोठतील श्वास शिशिरातल्या हिमात ह्रदये जपून ठेवा अंधार फार झाला वणव्यात वास्तवाच्या होईल राख त्यांची स्वप्ने जपून ठेवा अंधार फार झाला हे वाटतील परके आपुलेच श्वास आता हातात हात ठेवा अंधार फार झाला शोधात कस्तुरीच्या आहेत पारधी हे हरणे जपून ठेवा अंधार फार झाला बाजार हा फुलांचा येथे फुलेच विकती कलिका जपून ठेवा अंधार फार झाला ह्रदयात पाळलेल्या जखमातुनीच आता कंदील एक लावा अंधार फार झाला तू गेली तेव्हा by satyam badgujar | posted: 3 /12/2018 तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता श्वासाच्या अधरावरती मन झोका घेत होता तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता प्रेमाच्या त्या विरहात मन हेलकावत होता तू गेली तेव्हा रिमझिम पाऊस निनादत होता अंधाराच्या त्या झगमग तारा झुळूक घालती मृगजळ वारा तू गेल
Thanks for sharing ☺️
ReplyDelete