कोरोनाला पळून लावू
*अत्यंत अत्यंत अत्यंत महत्वाचं सर्वांनी अवश्य वाचा...* Mrs.paranjpe & her husband both retired as Sr. Scientists from BARC & recovered from COVID sharing in simple language causes & remedies. डॉ . अकल्पिता परांजपे आपण माझी "कोरोना ची आणि माझी भेट" ही पोस्ट वाचलीत. आणि भरभरून प्रतिसाद पण दिलात. त्यात काही प्रश्न अनुत्तरित आहेत. आज त्यांची उत्तरे द्यायला सुरवात करूया. त्याकरता प्रथम पोस्टचा काही भाग पुनर्रउददघृत करणार आहे. म्हणजे पूर्वीची पोस्ट न वाचणाऱ्यांना सुद्धा ही पोस्ट समजेल. अनेक कोरोना रुग्णांचा मृत्यू प्राणवायू कमी पडल्याने व फुफ्फुसांच्या त्रासाने होतो. काही रुग्णांना कोरोना बरा झाल्यावर सुद्धा श्वसनाचा त्रास होतो. कोरोना गेला. मग आता श्वास घ्यायला त्रास का? आपण याच उत्तर दोन दिशांनी शोधू शकतो. विज्ञान काय सांगत? हा विषाणू आपल्या शरीराच्या पेशींमध्ये शिरतो. आणि पेशी स्वतःच द्विभाजन करायला जी यंत्रणा वापरतात, त्याच यंत्रणेचा वापर करून स्वतःच्या मोठ्या प्रमाणात प्रति तयार करतो. अगदी आपल्या कव...